सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात विद्यार्थी सहायता जनजागृती अभियान उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र शासन व सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय,  मुरगूड यांच्या संयुक्त विद्यमाने  शिष्यवृत्ती विभाग आयोजित दिनांक १८/८/ २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त विद्यार्थी सहायता जनजागृती अभियान उत्साहात संपन्न झाले.

Advertisements

सुरुवातीस कार्यक्रमाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपांना पाणी घालून करण्यात आले. शिष्यवृत्ती विभागाचे प्रा. दादासाहेब सरदेसाई यांनी  सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत  केले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिलेल्या युवक शुभ संदेशाचे वाचन एनसीसी विभागाचे लेफ्टनंट प्रा. विनोद प्रधान यांनी केले.

Advertisements

त्यानंतर कागल विभागाचे मंडल अधिकारी श्री. सचिन हाके यांनी  विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शासकीय दस्तावेज संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच मुरगुड येथील ई-सेवा केंद्राचे समन्वयक मा. गौरव  मोर्चे यांनी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध शासकीय दस्तावेज व दाखल्या विषयी सविस्तर माहिती दिली.

Advertisements

सदरच्या उपक्रमात कोल्हापूर विभाग बार्टीचे समन्वय मा. किरण  चौगले यांनी सारथी, महाज्योती,अमृत, बार्टी व टार्टी या योजना विषयी पीपीटीच्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्तीची सविस्तर माहिती दिली. तसेच सारथीचे समन्वयक मा. निलेश पोवार यांनी सारथीद्वारे आयोजित  वेगवेगळ्या शासकीय योजनेची माहिती दिली.

सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले निर्भया पथक करवीरचे पोलीस निरीक्षक मा.अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थापासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये सातत्य ठेवून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उत्तम करिअर घडविण्या संदर्भात मार्गदर्शन केले. 

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये निर्भया पथक करवीरच्या मा. वनिता वडर, पोलीस कॉन्स्टेबल राजाराम पाटील, मुरगुड येथील ई-सेवा केंद्राचे अजिंक्य शिंदे,  श्री मोरबाळे,  यांची प्रमुख उपस्थिती होती. 

तसेच महाविद्यालयातील प्रा. डी.पी. साळुंखे, प्रा. डॉ. एम. एस. पाटील मॅडम, प्रा. डॉ. एच. एम. सोहनी, प्रा. डॉ. गुरुनाथ सामंत, प्रा. सौ. सावेकर मॅडम, प्रा. राम पाटील, प्रा. विनायक माने, प्रा. संजय हेरवाडे, प्रा. अशोक पाटील, प्रा. बाबुराव सारंग, प्रा. राजेंद्र  पाटील, प्रा. सुहास गोरुले, प्रा. राहुल बोटे, प्रा. संदीप मोहिते, प्रा. दयानंद कांबळे, प्रा. सौ.कुऱ्हाडे मॅडम, प्रा. सौ. मोरबाळे मॅडम, श्री राजू मंडलिक, श्री  साताप्पा कांबळे,  तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी सर्वांचे आभार उपप्राचार्य प्रा. डॉ. शिवाजी पोवार यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. अर्चना कांबळे व प्रा. सौ. दिपाली  सामंत  मॅडम यांनी केले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!