कागल शहरात अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट
त्यावेळी सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम असे मिळून 72 हजार रुपयांची चोरी केली सदर चोरीची घटना दिनांक 16 जुलै ते 18 जुलै दरम्यान घडली आहे. सदर चोरी तक्रार कागल पोलीस ठाण्यात नोंद केली असून तपास सहाय्यक फौजदार कोचरगी करत आहेत
कागल – येथील आधार कॉलनी श्रमिक वसाहत मध्ये राहणारे अजिंक्य माळी यांच्या घरी चोरी झाली असून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजातील काही भाग तोडून घरात घुसले.
अजिंक्य आनंदराव माळी प्लॉट नंबर १६ आधार कॉलनी श्रमिक वसाहत यांनी कागल पोलिसात दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार माळी हे गेली दोन दिवस बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाज्याच्या कुलुपाखालील लाकडी भाग तोडून घरात प्रवेश केला. रुपये आठ हजार किमतीचे चांदीचे ताट रुपये १२०० किमतीचे चांदीची समई. रुपये 25000 किमतीचे चांदीची प्लेट, कासव, हळद-कुंकवाचा करंडा, फुलपात्र ,चमचा ,मेकला लहान चेंबू दोन ,निरंजन. रुपये 12000 किमतीच्या गणपती व लक्ष्मीच्या चांदीच्या मूर्ती. रुपये पंधरा हजार रोक असा एकूण रुपये बहात्तर हजार चा माल अज्ञात चोरट्याने लंपास केला.
सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे .पूजेसाठी लागणारे चांदीचे साहित्य तसेच रोख रक्कम घेऊन अज्ञात चोरट्याने पोबारा केल्याने सर्वत्र चोरीची चर्चा होत आहे.
कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या आरक्षणाखाली सहायक फौजदार कोचरगी हे पुढील तपास करीत आहेत.