दिलीपराव सणगर ट्रस्ट आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद;

साडेचार हजार विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

​कागल : दिलीपराव सणगर चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट, गहिनीनाथ प्रिंटर्स अँड पब्लिकेशन्स आणि कागल पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कागल तालुक्यातील चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिष्यवृत्ती पूर्व सराव चाचणी’ परीक्षा उत्साहात पार पडली. या उपक्रमा अंतर्गत कागल तालुक्यातील यशवंतराव घाटगे हायस्कूल,कागल, मुरगूड विद्यालय, शिवराज विद्यालय, मुरगूड, न्यायमूर्ती रानडे विद्यालय सेनापती कापशी आदी २२ केंद्रांवर झालेल्या या सराव चाचणी परीक्षेत एकूण ४,५९७ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

Advertisements

परीक्षेचे प्रातिनिधिक उद्घाटन कागल येथे श्री. दत्त विद्या मंदिर येथे नगराध्यक्षा सौ. सविता माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “या सारख्या सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमधील भीती कमी होऊन प्रत्यक्ष परीक्षेवेळी त्यांचा आत्मविश्वास वाढतो. सणगर ट्रस्टने या शैक्षणिक उपक्रमाला दिलेली मदत कौतुकास्पद आहे.”

Advertisements

​      यावेळी उपस्थित गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे म्हणाल्या की, “चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही तिसरी सराव चाचणी आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने असे उपक्रम राबवल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय होते.”

कार्यक्रमास डॉ. मुकुंद सादिगले, नगरसेविका व शिक्षण विभाग सदस्या श्रीमती रंजना सणगर, ट्रस्टी सम्राट सणगर, संदीप सणगर, मुख्याध्यापिका अश्विनी आतवाडकर आदी उपस्थित होते. एस. बी. सांगले यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रप्रमुख एस. व्ही. पाटील यांनी आभार मानले.

यशवंतराव घाटगे हायस्कूल कागल

यशवंतराव घाटगे हायस्कूल कागल या केंद्रावर संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष सौरभ बाबासो पाटील, मा. नगरसेवक विवेक लोटे व गहिनीनाथ सहकारी दूध संस्थेचे चेअरमन अमर सणगर यांच्या हस्ते चाचणी परीक्षेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तंत्र स्नेही काशिनाथ यशवंत सुतार, मुख्याध्यापक सर्जेराव पाटील, अशोक विश्वास घाटगे, गजानन आप्पासाहेब हेगडे, विक्रम विलासराव माने, केंद्र संचालक काशिनाथ विभुते आदी मान्यवर उपस्थित होते.

मुरगुड विद्यालय

मुरगुड विद्यालय, मुरगुड येथे नगरसेवक राहुल शिंदे व कागल तालुका पतसंस्था फेडरेशनचे संचालक सुनील कांबळे यांच्या हस्ते सराव परीक्षेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्र प्रमुख, सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

शिवराज विद्यालय मुरगुड

शिवराज विद्यालय मुरगुड येथे कागल तालुका पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष बाळासो ढवण व कागल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर.एस. गावडे यांच्या हस्ते सराव परीक्षेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाची प्राचार्य व्ही.बी. खंदारे, माजी मुख्याध्यापक बी.एल. दाभोळे केंद्रप्रमुख संजय चिखलीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यायमूर्ती रानडे विद्यालय, सेनापती कापशी

सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालय येथे मधुकर ढोबळे व चंद्रकांत ढोबळे यांच्या शुभहस्ते सराव परीक्षेचा शुभारंभ करण्यात आला.

सिद्धनेर्ली विद्यालय

सिद्धनेर्ली विद्यालय, सिद्धनेर्ली येथे पत्रकार रवींद्र पाटील, विजय कुरणे, तानाजी सोनाळकर व सागर लोहार या मान्यवरांच्या उपस्थितीत सराव परीक्षेचा शुभारंभ करण्यात आला.

श्री. दत्त विद्यामंदिर कागल येथे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पूर्व सराव परीक्षेचे उद्घाटन करताना कागल नगरपालिका नगराध्यक्षा सौ. सविता माने, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, डॉ. मुकुंद सादिगले, नगरसेविका श्रीमती रंजना सणगर, दिलीपराव सणगर ट्रस्टचे ट्रस्टी सम्राट सणगर, मुख्याध्यापिका अश्विनी आतवाडकर, केंद्रप्रमुख एस.व्ही. पाटील, संदीप सणगर, आदी मान्यवर.

Leave a Comment

error: Content is protected !!