जय गणेश तरुण मंडळाच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील कापशी रोडवरील जय गणेश तरुण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ७० रुग्णांची जनरल तपासणी करण्यात आली.

Advertisements

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन बिद्री साखरचे संचालक प्रविणसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले , बिद्री साखर चे माजी संचालक बाजीराव गोधडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisements

यावेळी डॉ.फारूख देसाई, डॉ पूजा देवकाते, निकीता भांदिगरे, संकेत रानमाळे, मानसी गोधडे, सुनिता आरडे यांनी आरोग्य शिबीरात रुग्णांची तपासणी केली.

Advertisements

यावेळी दत्तात्रय मंडलिक, प्रसाद गोधडे, शिवाजी चौगले, राजू कांबळे, विजय गोधडे, जगन्नाथ पुजारी, विक्रम गोधडे,  प्रवीण लोहार (भोला), मारुती शेणवी, उत्तम बरकाळे, सचिन कुंभार, सचिन परीट, प्रदीप कुंभार, ओंकार जाधव, प्रसाद शेणवी, आणासो बरकाळे, सुरेश सुतार, पेंटर दिलीप लोहार, विठ्ठल शेणवी, लखन गोंधळी आदि उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक अध्यक्ष विक्रम गोधडे यांनी तर खजिनदार भोला लोहार यांनी आभार मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!