शेंडूर येथे मोबाईल ऍप शुभारंभ व विविध पुरस्कारांचे वितरण
व्हनाळी(सागर लोहार) : सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सह पतपेढी कागल या संस्थेने शिक्षकांची पत वाढवत राज्यातील अग्रगण्य पतसंस्था असा नावलौकीक संपादन केला आहे. नेहमीच पारदर्शी काराभारास सर्वोच्च प्राधान्य देत या संस्थेने सहकारात आदर्श निर्माण केला असून वेतन आयोग लागू करणारी हि एकमेव शिक्षक पतसंस्था असल्याचे प्रतिपादन अन्नपुर्णा शुगरचे चेअरमन, मा.आम. संजयबाबा घाटगे यांनी केले.
आर.के. मंगल कार्यालय शेंडूर फाटा ता.कागल येथे सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सह.पतपेढी कागल यांचेमार्फत मोबाईल अॅप शुभारंभ व विविध पुरस्कार वितरण प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी गोकुळ चे संचालक अंबरिषसिंह घाटगे,शिक्षण समितीचे माजी सदस्य सुनिल पाटील प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी मोबाईल अॅप चा शुभारंभ, सेवानिवृत शिक्षक, विविध पुरस्कार प्राप्त सभासद, शिष्यवृतीधारक सभासद पाल्य यांना पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गैारव करण्यात आला. गोकुळ चे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच कोविड 19 च्या संकट काळातही शिक्षकांनी पुढे येऊन कार्य केले आहे. शिक्षक केवळ आपल्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिकवत नाहीत, तर आव्हानात्मक काळात त्यांना जीवनाची योग्य दिशा दाखवतात. त्यामुळेच शिक्षकांचे कार्य समाजासाठी नेहमीच आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासो निंबाळकर,सुनिल पाटील,एस.व्ही.पाटील,रवीकुमार पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अध्यक्ष तुकाराम मोहिते, उपाध्यक्षा दर्शना नलवडे, संताजी पाटील, सुरेश सोनगेकर, एकनाथ बागणे, प्रकाश चैागले, मोहन पाटील,के.डी.पाटील, प्रकाश मगदूम ,अरविंद शिंदे, सतिश पाटील, सर्व संचालक उपस्थीत होते. स्वागत रमेश जाधव यांनी केले आभार शिवाजी तिप्पे यांनी मानले.