
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज गोकुळ प्रकल्पला भेट देऊन तेथील दुध व दुग्धजन्य पदार्थ कसे तयार करतात व दुधाचे पकिग व कार्यकसे चालते याविषयी माहिती घेऊन नंतर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस यंत्रणेच्या कार्याविषयी सखोल माहिती घेतली. या कार्यशाळेत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी कसे कार्य करतात, त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.
गोकुळ शिरगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. जे. मगदूम यांनी विद्यार्थ्यांना पोलीस काय करतात याबाबत प्रश्न व श़ंका विचारून चर्चा केली. विद्यार्थ्यांनी याबाबत अनेक उत्सुकतापूर्वक प्रश्न विचारले.
पोलिस अधीक्षक मगदूम मॅडम यांनी नोकरीसाठी चरित्र प्रमाणपत्र (एन.ओ.सी.)ची गरज, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया आणि मोबाईलचा योग्य वापर याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी सांगितले की, मोबाईल हा एक शक्तिशाली साधन असला तरी त्याचा गैरवापर होऊ शकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असल्याने विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर संयमितपणे आणि शिक्षणासाठी करावा, असे आवाहन केले.
विद्यार्थी आणि शिक्षक यांनी पोलीस ठाण्याचे निरीक्षण करून सीसीटीव्ही कॅमेरे, एफ.आर. डायरी नोंदणी प्रक्रिया आणि पोलीस अधिकाऱ्यांची कार्यपद्धती याबाबत भरत कोरवी यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल किरण चंद्रकांत मोरे यांनी विद्यार्थ्यांना रायफल या शस्त्राविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमास गोकुळ शिरगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.जे. मगदूम, गोपनीय अधिकारी भरत कोरवी, पोलीस कॉन्स्टेबल किरण मोरे, दिपाली पाटील तसेच शाळेचे शिक्षक एच. आर लौंढे, पाटील एल. डी., रामदास पाटील, रवींद्र मिठारी, श्रीमती लोहार मॅडम, देवकारे मॅडम, सीमा कांबळे, आनंदा पाटील, भाऊसो पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना पोलीस केंद्राची माहिती देणे ही काळखची काळाची गरज आहे
I loved as much as youll receive carried out right here The sketch is tasteful your authored material stylish nonetheless you command get bought an nervousness over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again since exactly the same nearly a lot often inside case you shield this hike