गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलची नवीन कार्यकारिणी निवडून आली आहे. या पंचवार्षिक कालावधीसाठी (2024-2029) श्री. एम. एस. पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.
नवीन कार्यकारिणीमध्ये श्री. टी. के. पाटील उपाध्यक्ष, श्री. बापुसो बळवंत पाटील कार्यवाह, श्री. किरण त्रिबंक गोरे सह-कार्यवाह, श्री. महादेव पांडुरंग डावरे खजानिस, श्री. उदय महादेव पाटील आणि श्री. रावसाहेब कृष्णात पाटील संचालक म्हणून काम पाहतील.
निवड प्रक्रियेनंतर आयोजित कार्यक्रमात, तज्ञ मार्गदर्शक श्री. के. के. पाटील यांनी शाळेची सविस्तर माहिती सांगितली. यावेळी रावसाहेब पाटील यांनी सर्व पदाधिकारी आणि उपस्थितांचे आभार मानले. या नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल गोकुळ शिरगावचे नागरिक मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देत आहेत.