मुरगूड ( शशी दरेकर ) : आयुष्यभर प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे , अलौकिक ज्ञान , सहकार क्षेत्रातील जान , अमोघ वाणी , विलक्षण नम्रता , उच्च कोटीची कर्तव्यनिष्ठा असे बहुआयामी व्यक्तीमत्व लाभलेले व मुरगूड येथिल सुवर्णमहोत्सवी श्री .लक्ष्मीनारायण नागरी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक जवाहर शहा यांचा ८५वा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला.
यावेळी चेअरमन किशोर पोतदार यानीं पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा करून त्यांच्या दिर्घायुष्याबद्दल अभिष्टचिंतन केले.

यावेळी व्हा . चेअरमन दत्तात्रय कांबळे , संचालक पुंडलिक डाफळे , दत्तात्रय तांबट , अनंत फर्नांडीस, चंद्रकांत माळवदे , विनय पोतदार , रविंद्र खराडे , रविंद्र सणगर, संचालिका सौ . सुजाता सुतार , सौ . सुनिता शिंदे , श्रीमती भारती कामत , तज्ञ संचालक जगदीश देशपांडे , कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी , सचिव मारूती सणगर यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होते .