शिवसेना खोकी धारक संघटनेतर्फे शिवजयंतीनिमित्त रक्तदान आणि महाप्रसादाला मोठा प्रतिसाद

गोकुळ शिरगाव : “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या भावनेतून गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा येथे शिवसेना खोकी धारक संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.

Advertisements

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, व तालुका प्रमुख विनोद खोत होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वैभव लक्ष्मी ब्लड बँक आणि युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग गोकुळ शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शिवसेना कार्यकर्ते, कामगार आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तसेच शिवभक्त आणि कामगारांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Advertisements

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, तालुकाप्रमुख विनोद खोत ,खोकी धारक संघटनेचे अध्यक्ष शंकर खोत( SK), उपाध्यक्ष रमेश पाटील,उपतालुका प्रमुख शांताराम पाटील, उपतालुका प्रमुख अभिजित पाटील,अशरफ पखाली, सत्तापा गाडेकर, भारत खोत, सुरेश पाटील, गिरीश बुजरे, विजय गायकवाड, सागर पाटील, बाजीराव पाटील, मोहन सातपुते, प्रल्हाद कांबळे, भिमराव मेटली आणि युवा एनजीओचे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

शंकर खोत म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे, शस्त्रक्रिया होत आहेत. त्यामुळे रुग्णांना रक्ताची गरज भासते. परंतु, त्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम पाटील आणि आभार अभिजीत पाटील यांनी मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!