मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता कागल येथे ” मुरगूड शहर जेष्ठ नागरिक ” संघाच्या वतीने दि .२९व३० जानेवारी २०२५ रोजी संघाच्या विरंगुळा केंद्रात एकेरी व दुहेरी कॅरम स्पर्धा मैत्रीपूर्ण व उत्साही वातावरणात पार पडल्या.
प्रारंभी सर्व स्पर्धकांचे स्वागत संघाचे उपाध्यक्ष पी .डी. मगदूम यानीं केले. यावेळी स्पर्धैचे पंच म्हणून प्रकाश ढाणे व संजय गळफासे यानी काम पाहिले.
सर्वप्रथम लॉटप्रमाणे कॅरस्पर्धा कशा प्रकारे होणार याची सविस्तर माहिती देण्यात आली .व पंचानी स्पर्धेच्या नियम व अटी स्पर्धकाना समजावून सांगितल्या.
कॅरम स्पर्धेचे उदघाटन संघाचे जेष्ठ सदस्य दादोबा मडिलगेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष श्री. गजाननराव गंगापूरे यानीं कॅरम स्पर्धा शांततेत, खिलाडू वृत्तीने, आनंददायी वातावरणात व मैत्रीपूर्ण पार पाडाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. कॅरम स्पर्धा अत्यंत अटीतटीने व उत्साही वातावरणात पार पडल्या.
स्पर्धा पहाणेसाठी जेष्ठानीं व नागरीकानी गर्दी केली होती .
पंचानी स्पर्धा संपन्न झाल्यानंतर निकाल जाहीर केला.
एकेरी कॅरम स्पर्धा –
प्रथम क्रमांक -श्री . तुकाराम भारमल , दुसरा क्रमांक -श्री . महादेव वागवेकर , तिसरा क्रमांक –
श्री रामचंद्र सातवेकर व उत्तेजनार्थ -श्री तानाजी डवरी .
दुहेरी कॅरम स्पर्धा –
प्रथम क्रमांक -श्री . किशोर पाटील व श्री . लक्ष्मण गोधडे .
दुसरा क्रमांक -श्री . अशोक डवरी व श्री . सुरेश दरेकर .
तिसरा क्रमांक -श्री . तुकाराम भारमल व रामचंद्र रणवरे व उत्तेजनार्थ बक्षीस श्री . तानाजी डवरी व श्री .सदाशिव एकल .
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघाचे गजानन गंगापूरे (अध्यक्ष), पी .डी. मगदूम (उपाध्यक्ष), सदस्य सर्वश्री अशोक डवरी, शिवाजी कांबळे, सखाराम सावर्डैकर, मोहन कांबळे, दत्तात्रय घाटगे यांच्यासह संघाचे सदस्य, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, शिवराज हायस्कूल, विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूल यानीं देणगी रूपाने बक्षिसांची रक्कम देऊन संघास आर्थिक सहकार्य केले .
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन किशोर पाटील यानी केले तर आभार संचालक जयवंत हावळ यानी मानले.