ज्येष्ठानी आपले उर्वरीत आयुष्य सुखासमाधानात, तणावमुक्त व्यतीत करावे – गजानन गंगापूरे

मुरगूड ( शशी दरेकर ) –  मुरगुड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने १ ऑक्टोंबर रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिन संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजानन गंगापूरे होते. प्रारंभी संघाचे सदस्य कृष्णा खाटांगळे व सुनंदा गुजर यांचे दुःखद निधनाबद्दल दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर संघाचे उपाध्यक्ष पी. डी. मगदूम यानीं उपस्थित सर्वांचे स्वागत केले. यावेळी संघाच्या सदस्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

Advertisements

संचालक जयवंत हावळ यानी प्रास्ताविकात संघाच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे महत्व स्पष्ट केले. यावेळी ऑगष्ट , सप्टेंबर मधील सदस्यांचे वाढदिवसानिमित्य१२ सदस्यांचा गुलाबपुष्प व पेढा भरवून त्यांना दिर्घायुष्य लाभावे म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या.

Advertisements

संघाचा वाचन कट्टा उपक्रम प्रत्येक रविवारी अव्याहतपणे सुरु असुन २५१वा वाचनकट्टा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेबद्धल जयवंत हावळ, रामचंद्र पाटील, मधुकर सामंत, सिकंदर जमादार, विनायक हावळ, प्रदिप वर्णे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

Advertisements

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात गजानन गंगापूरे यानीं जागतिक जेष्ठ नागरीक दिनाचे महत्व विशद करत जेष्ठांच्या सद्यस्थितीचा , त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार व अन्यायाचा संक्षिप्त आढावा घेतला. जेष्ठानी आपले उर्वरीत आयुष्य सुखासमाधानात, आनंदात , आरोग्यदायी व तणावमुक्त जीवन व्यतीत करावे, आपल्या प्रकृतिची काळजी कशी घ्यावी, कसे वागावे या सर्व बाबतीत मार्गदर्शन केले.

यावेळी सत्कार मुर्ती पी. व्ही. पाटील, चंद्रकांत दरेकर, महादेव साळोखे यांच्यातर्फे उपस्थिताना नाष्टा, चहापान देण्यात आले व सदस्य रमेश भोपळे, आनंदा चांदेकर यानीं संघासाठी देणगी स्वरूपात आर्थिक हातभार लावला.

या कार्यक्रम प्रसंगी सदाशिव एकल, महादेव वागवेकर, प्रा. चंद्रकांत जाधव, किशोर पाटील, गणपती शिरसेकर, सदाशिव यादव, दादू बरकाळे, लक्ष्मण गोधडे, रघुनाथ सुर्यवंशी, सूरेश दरेकर , बाजीराव खराडे , किरण गवाणकर, विलास सुर्यवंशी, मारूती रावण, दादोबा मडिलगेकर, रामचंद्र रणवरे, मारूती गोधडे, प्रकाश ढाणे यांच्यासह जेष्ठ नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक डवरी यानीं केले तर शेवटी सचिव सखाराम सावर्डेकर यानी आभार मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!