मुरगूड (शशी दरेकर) : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाची निवड झाली असून हा संघ 14 ते 18 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धा स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे होत आहेत.
शिवाजी विद्यापीठ संघातील खेळाडू असे : ओंकार लोकरे, विवेक चौगले, सत्यजित शिंदे (मंडलिक महाविद्यालय मुरगूड ),विजय खामकर, कृपेश पाटील ( दूध साखर महाविद्यालय बिद्री), अथर्व तोडकर, विजय पाटील ( डीआर माने महाविद्यालय कागल ), सौरभ जगदाळे, धिरज पाटील (एस के पाटील महाविद्यालय कुरुंदवाड ), विश्वरुप पाटील , आदित्य सदामते ( केबीपी कॉलेज इस्लामपूर), अभिजीत कांबळे (अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले), अमन नायकवडे (देवचंद कॉलेज अर्जुन नगर ), ऋषीकेश ठमके (विवेकानंद कॉलेज कोल्हापूर) या स्पर्धेसाठी संघाबरोबर प्रशिक्षक संदीप पाटील,सहा. प्रशिक्षक तथा व्यवस्थापक डॉ. सुनील चव्हाण जात आहेत.