
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता कागल येथील शिवराज विद्यालय जुनिअर कॉलेजच्या अविनाश मारूती तसीलदार याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय पॉवरलिफ्टिंगसाठी निवड झाली.
अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 120 किलो वजन गटांमध्ये सुवर्णपदक मिळवून नेत्र दीपक यश संपादन करत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये निवड होणारा शिवराजचा पहिलाच खेळाडू असून त्याला ए एस पावर चे प्रशिक्षक सुशांत नलवडे, प्रा.सुशील अकोळकर, क्रीडा शिक्षक एकनाथ आरडे यांचे मार्गदर्शन तसेच जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी खासदार संजय मंडलिक, कार्याध्यक्ष वीरेंद्र भैया मंडलिक, अध्यक्ष गजानन गंगापुरे, कार्यवाह आण्णासो थोरवत, प्राचार्य जी के भोसले, प्रा एस. एन. अंगज, उपप्राचार्य एल. व्ही.शर्मा, प्रा. आर जी पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले.
त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
There is noticeably a bundle to know about this. I assume you made certain nice points in features also.