सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीचा १२ वा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ गुरुवारी!

चेअरमन नवीदसो मुश्रीफ यांच्या शुभहस्ते संपन्न होणार

कोल्हापूर: बेलेवाडी काळम्मा-धामणे, ता. कागल, जि. कोल्हापूर येथील सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि. चा १२ वा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ गुरुवारी (०२/१०/२०२५) रोजी सकाळी १०.४९ वाजता फॅक्टरीच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे.

Advertisements

हा समारंभ कारखान्याचे चेअरमन मा. श्री. नवीदसो हसनसो मुश्रीफ यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. श्री. नवीदसो मुश्रीफ हे चेअरमन, सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी तसेच चेअरमन-कोल्हापूर जिल्हा सह.दुध उत्पादक संघ (गोकुळ) कोल्हापूर या दोन्ही महत्वाच्या पदांची धुरा सांभाळत आहेत.

Advertisements

या कार्यक्रमासाठी शेतकरी सभासद वर्ग, पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक, कर्मचारी व हितचिंतक यांसारख्या प्रमुख उपस्थितांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांची उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. यावेळी सर्व संचालक मंडळ व जनरल मॅनेजर श्री. संजय शामराव घाटगे हे उपस्थित राहतील.

Advertisements

दिनांक व वेळ: गुरुवार ०२/१०/२०२५ सकाळी १०.४९ वा.
स्थळ: सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि. बेलेवाडी काळम्मा-धामणे, ता. कागल, जि. कोल्हापूर

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!