मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम वाचनालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकराजा राजर्षी  छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती मुरगुड ता . कागल येथिल हुतात्मा तुकाराम वाचनालयात उत्साहात साजरी करण्यात आली. मुरगूड नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी संदीप घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत  शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

Advertisements

यावेळी मुरगुड चे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके , माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले, माजी नगरसेवक व वाचनालयाचे सचिव शिवाजीराव चौगले, माजी नगरसेवक व व्यापारी नागरी पतसंस्थेचे सभापती आणि वाचनालयाचे संचालक किरण गवाणकर ,माजी नगरसेवक मारुती कांबळे , माजी नगरसेवक दिपक शिंदे  वाचनालयाचे संचालक अविनाश चौगले, ॲड. खाशाबा भोसले , वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी , मुरगुड नगरपालिकेचे बांधकाम अभियंता प्रकाश पोतदार, अमर कांबळे , बाळासाहेब कांबळे, प्रतिक पाटील, ग्रंथपाल संदिप वरपे, सौ . रेखा भारमल , शुभांगी कलकुटकी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

स्वागत व प्रास्ताविक वाचनाचे संचालक ॲड. खाशाबा भोसले यांनी केले. आभार संचालक मारूती कांबळे यांनी मानले.

AD1

1 thought on “मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम वाचनालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन”

Leave a Comment

error: Content is protected !!