बामणी येथील मॅरेथॉन स्पर्धेत साहिल मगदूम प्रथम

सिद्धनेर्ली,ता.४ः बामणी ता कागल येथील मॅरेथॉन स्पर्धेत साहिल जयराम मगदूम याने प्रथम क्रमांक पटकाविला. विवेक बाबुराव कांबळे व यश विठ्ठल पवार यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.

Advertisements

कालवा अकॅडमी मार्फत या स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्या स्पर्धकांना उपसरपंच तानाजी मगदूम, शिवाजी मगदूम, बाबुराव मगदूम, अरविंद बाबर आदींच्या हस्ते बक्षीस वितरण केले. स्पर्धेचे संयोजन स्वप्निल बाबर, आदेश पाटील, पांडुरंग मगदूम ,अनिकेत मगदूम, भारत पाटील,रोहित पाटील यांनी केले.

Advertisements

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!