सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी कल्याण संघटकांचा सुधारित मासिक दौरा

कोल्हापूर(जिमाका): सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचबरोबर कल्याण व पुनर्वसनच्या दृष्टीने योजना व सवलतीची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथील कल्याण संघटक यांचा माहे डिसेंबर 2024 चा सुधारित मासिक दौरा आयोजित करण्यात आला आहे. संबंधित तालुक्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.

Advertisements

सुधारित मासिक दौरा पुढीलप्रमाणे-

Advertisements

गडहिंग्लज- पहिला शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी तहसिल कार्यालय गडहिंग्लज,

Advertisements

चंदगड- दुसरा शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी तहसिल कार्यालय, चंदगड,

शाहुवाडी- तिसरा गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी तहसिल कार्यालय, शाहुवाडी

शिरोळ- चौथा मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी तहसिल कार्यालय, शिरोळ व

आजरा- चौथा शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी तहसिल कार्यालय, आजरा याप्रमाणे होणार आहे.

तहसिलदार कार्यालयातील सर्व दौरे निर्देशित ठिकाणी होतील. या दिवशी शासकीय किंवा इतर सुट्टी असल्यास त्या तालुक्याचा दौरा पुढील महिन्यात घेण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!