मुरगूड ( शशी दरेकर ) : परभणी येथे संविधानाच्या झालेल्या विटंबनेचा व अमित शहा यांच्या वक्तव्याचा मुरगूडमध्ये आंबेडकरवादी चळवळीतर्फे जाहिर निषेध करून जोडे मारो आंदोलन केले . आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी .
परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधान असून याठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करून संविधानाचा अवमान केला आहे असा अवमान करणारा सुशिक्षित आहे तो माथेफिरू नसून देशद्रोही आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करुन त्यास फाशी दयावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे फॅशन झाली आहे असे वक्तव्य करून महामानवाचा अपमान करणाऱ्या अमित शहानी माफी मागावी व आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दयावा अशी आंदोलकांनी मागणी केली.
निषेध व्यक्त करताना अमित शहा यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलनही केले.
यावेळी माजी नगरसेवक मारुती कांबळे ‘ दिलीप कांबळे ‘ एन .एल . कांबळे ‘ विष्णू धोंडीराम कांबळे ‘ राजू कांबळे , माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी ‘ हेमंत पोतदार महेश कांबळे ‘ यांची निषेधपर भाषणे झाली .
या आंदोलनात माजी नगराध्यक्षा सौ फुलाबाई कांबळे ‘ माजी उपनगराध्यक्ष मधुकर भिवा कांबळे ‘ बजरंग सोनुले ‘ पुंडलिक धर्मा कांबळे दत्तात्रय मंडलिक ‘ काजल कांबळे यांच्यासह आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.