कागलमध्ये लाखोंचा ऐवज लंपास, चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान

कागल (विशेष प्रतिनिधी): कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील वाकी वसाहतीत एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ११ लाख ३१ हजार ४४५ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Advertisements

गुरुनाथ बाळू पाटील यांच्या घरी झालेल्या या चोरीमुळे कागल पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, बाळू पाटील हे कामासाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरात प्रवेश करताच चोरट्यांनी कपाटातील सर्व साहित्य विस्कटून टाकले.

Advertisements

यानंतर त्यांनी सोन्याचे दोन नेकलेस, ब्रेसलेट, चेन, पुतळी हार, झुमका, मणी, सहा अंगठ्या तसेच चांदीचा छल्ला, जोडवी आणि इतर दागिने यासह ५० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

या घटनेने कागल परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

चोरट्यांचा लवकरच शोध घेऊन त्यांना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात अनोळखी व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!