मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर पत्रकार (journalist) संघाच्या अध्यक्षपदी दैनिक तरुण भारत संवादचे मुरगूड प्रतिनिधी प्रा. रवींद्र शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी राजू चव्हाण (दै. तुफान क्रांती) तर सचिव पदी प्रवीण सूर्यवंशी (दै. महान कार्य)यांचीही निवड करण्यात आली.
पत्रकारांच्या झालेल्या वार्षिक बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे अनिल पाटील (दै. लोकमत ) होते.
या बैठकीस प्रा. सुनील डेळेकर (दै. पुढारी), प्राचार्य शाम पाटील (दै. पुढारी), दिलीप निकम (दै. महासत्ता), अविनाश चौगले (दै. सामना), समीर कटके (दै. तरुण भारत संवाद), संदीप सूर्यवंशी (दै. हॅलो प्रभात) , जोतीराम कुंभार (दै. जनमत )आदी उपस्थित होते.
यावेळी मागील कामाचा आढावा घेऊन येत्या ६ जानेवारी रोजी होणाऱ्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच येत्या वर्षभरात विविध उपक्रम हाती घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
स्वागत ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुनिल डेळेकर, प्रास्ताविक समीर कटके आणि सूत्रसंचालन अविनाश चौगुले यांनी केले. आभार दिलीप निकम यांनी मानले.