मुरगूड ( शशी दरेकर ) – प्रियांका येरुडकर हिचा ऑल इंडिया सिव्हील सर्व्हिस कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्या बद्दल मुरगूड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज संकुल यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वस्ताद आनंद गोधडे होते तर प्रियांका येरुडकर हिचा सत्कार प्रमुख पाहुणे मुरगूड चे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हस्ते केला ‘ तर प्रमुख उपस्थित माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी हे होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर,एम टी सावंत ,पैलवान सुनील शेलार , मानाजी सासने, रंगराव चौगुले, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी आधी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. स्वागत राजू चव्हाण यांनी तर प्रास्ताविक पैलवान आमित तोरशे यांनी केले.
यावेळी राजेखान जमादार म्हणाले पैलवान हा सुसंस्कृत असला पाहिजे, पैलवानांना आपल्या परिस्थितीची जाणीव असणे आवश्यक आहे, छत्रपती शिवाजी महाराज संकुलनाने गेल्या चार वर्षात अतिशय सुंदर असे त्यांनी पैलवान घडविले व मुरगूड शहरातून ते बॉईज भरतीसाठी प्रॅक्टिस घेतात याचा आम्हाला अभिमान वाटतो . याबद्दल एन आय एस कुस्तीकोच स्वप्निल इंदुरीकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले .
यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी पैलवान प्रियांका येरुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजू चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक अमित तोरशे यांनी केले
यावेळी विनोद चौगुले, सिध्दू दिवटे, सर्जेराव हासबे, अंकुश मांगले आदीसह छ .शिवाजी महाराज संकुलचे सर्व पैलवान उपस्थित होते . आभार पैलवान पृथ्वीराज कदम यांनी मांडले.
As I website possessor I believe the content material here is real great, regards for your efforts.