मुरगूडमध्ये प्रवीणसिंह पाटील यांच्या बैलाने तोडली कर्नाटकी बेंदूर सणाची ‘कर’!

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथे कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.

Advertisements

मुरगूड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या बैलाने यावर्षी सदर कर भर पावसात तोडली. कर तोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील यांच्या समवेत पाटील कुटुंबीयातील सर्व सदस्य मानकरी म्हणून यावेळी हजर होते.

Advertisements

बैलपोळा सणानिमित्त यावर्षी प्रवीणसिंह पाटील यांच्या बैलाला कर तोडण्याचा मान होता  कित्येक दशकापासून कै.विश्वनाथराव पाटील  व कै.विठ्ठलराव पाटील यांच्याकडे पाटीलकी असल्यामुळे  कर तोडण्याचा मान पाटील घराण्याकडे असतो एक वर्ष विश्वनाथराव पाटील व एक वर्ष विठ्ठलराव पाटील  यांच्याकडे  त्यांच्या पश्चात आज त्यांचे पुत्र प्रवीणसिह पाटील व रविराज पाटील यांच्याकडे हा मान आहे तो मान दोन्ही बंधू  आनंदाने  करत आसतात.

Advertisements

आज दिवस भर या निमित्त या बैलाला नटवण्यात आले होते. रंगवण्यात आले होते. फुगे बांधण्यात आले होते. गुलालाची उधळण करत फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती . अंबाबाई मंदिर येथे या बैलाचे पूजन करून कर पूर्ण करण्यासाठी सोडण्यात आले त्यानंतर या बैलाने कर तोडली हा कर तोडण्याचा क्षण पाहण्यासाठी मुरगूडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!