शासकीय अधिकाऱ्यांची पाहणी
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील नाका नंबर एक ते सरपिराजीराव तलाव इथपर्यंतच्या रस्त्याला जवाहर रोड असे नांव आहे. या रस्त्यावर पडलेल्या अनेक खड्ड्यांच्यामुळे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे.
हा रस्ता रहदारीचा व मुरगूड शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या रस्त्याच्या आजूबाजूस बीएसएनएल चे कार्यालय ,बँका, औषधाची दुकाने, दवाखाने, ग्रामीण रुग्णालय, वाचनालय, नगरपरिषदेची इमारत , एसटी बस स्टॅन्ड, तुकाराम चौक ही महत्त्वाची ठिकाणे असून प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांची सुद्धा या रोडवरून रहदारी सतत सुरू असते.
” रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते “असे एक विनोदी वाक्य प्रसिद्ध आहे. या विनोदाचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मुरगुडचा जवाहर रोड असे म्हंटले जाते .सोशल मीडियावर सुद्धा या रस्त्याच्या दुर्दशेबद्दल प्रतिक्रिया उमटल्या आहेत.


सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरील उड्डाण पुलाच्या संदर्भात पाहणीसाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी जवाहर रोडची सुद्धा पाहणी केली. नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने या रस्त्याची दुर्दशा त्यांच्या निदर्शनास आणली. नागरिकांच्या आग्रहास्तव या रस्त्याच्या दुरुस्तीसाठीचा अहवाल आम्ही पुढे पाठवू असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्ती बद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. हा रस्ता मुरगूडच्या वैभवात भर घालणारा व शहरात प्रवेश करणाऱ्या महत्त्वाच्या मार्गापैकी एक आहे.
नागरिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत असेही येथील कार्यकर्त्यांनी सांगितले. आज शासकीय अधिकाऱ्यांनी भेट घेऊन पाहणी केली याप्रमाणे अधिकारी एसी संदीप मोगलेवारसो, व नायकवडेसो, चौगलेसो, तसेच उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रणजीत सूर्यवंशी, दिग्विजयसिंह पाटील, दिगंबर परीट, सर्जेराव भाट, संजय मोरबाळे, नंदकिशोर खराडे, संदीप भारमल, जगन्नाथ पुजारी, दिगंबर परीट, संपत कोळी, मारुती पुरीबुवा, विजय मेंडके, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.