4 महिलांसह 8 जणांवर गुन्हा दाखल
कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील एकोंडी येथील एका फार्म हाऊसवर कागल पोलिसांनी रात्री उशिरा छापा मारला ,.येथे चाललेल्या रंगेल पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चार महिलांसह ,आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये कागल, हुपरी, कोल्हापूर येथील महिलांचा समावेश आहे.
कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करीत अश्लील गाण्याच्या तालावर बिभत्स नृत्य या ठिकाणी चालू होते. विनापरवाना मद्यपान चालू होते .पोलिसांनी छापा मारला त्यावेळी महिलांसह मद्य धुंदीत असलेल्या मंडळांची नशा भानावर आली.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यांची नावे अशी, विजय नरसिंह कुलकर्णी वय 50 अविनाश नारायण कुलकर्णी वय 56 नितीन अमरीश आवटे वय 46 सर्व राहणार बार्शी तालुका सोलापूर,. लता रंगराव जगताप वय 38 राहणार -जुने घरकुल बेघर वसाहत, कागल, वैशाली घोडके व 27 राहणार राजेंद्र नगर -कोल्हापूर, पूजा सचिन पाटील राहणार-हुपरी तालुका- हातकणंगले, कृष्णा तुकाराम चौगुले वय 65 राहणार- एकोंडी तालुका कागल.
ही कारवाई मध्यरात्री एक वाजता कागल पोलिसांनी केली आहे .आरोपींकडून मद्य व किमती मोबाईल जप्त केले आहेत. पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत.