कागलचे पोलीस पाटील शिवगोंडा उर्फ बाळ पाटील यांचे निधन

कागल / प्रतिनिधी :
कागलचे पोलीस पाटील शिवगोंडा उर्फ बाळ पाटील यांचे वार्धक्याने सोमवारी रात्री निधन झाले. ते 79 वर्षाचे होते. बाळ पाटील हे दहा वर्ष शाहू सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. राजे बँकेचे प्रेसिडेंट पद त्यांनी भूषविले होते. राजे बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांचा वाटा होता .कागल नगरपालिकेचे ते नगरसेवक होते.

Advertisements

तरुण वयातच त्यांच्यावर पोलीस पाटीलकीची जबाबदारी पडली .ते पन्नास वर्षे पोलीस पाटील होते .त्यांनी पोलीस पाटील पदाचा चांगला कारभार करून दाखवत एक आदर्श पोलीस पाटील कसे असतात हे त्यांनी दाखवून दिले आहे.

Advertisements

त्यांच्या पश्चात एक मुलगी मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!