कागल (प्रतिनिधी) : गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या दोन सणांचे अनुषंगाने कागल पोलिसांनी शहरातून फिरून संचलन केले. संचलना करिता कागल पोलीस ठाण्याकडील एक अधिकारी व दहा पोलीस अंमलदार, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील एक अधिकारी व तीन पोलीस, कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील आर सी पी विभागाचा एक अधिकारी व सत्तावीस कर्मचारी हा इतका फौज फाटा कागल मध्ये दाखल झाला.
Advertisements
कागल पोलीस ठाण्यापासून संचलनास सुरुवात झाली. गैबी चौक मार्गे, मरकज मशीद,छत्रपती संभाजी महाराज पुतळा, निपाणी वेस, मातंग वसाहत ,सांगाव नाका, ठाकरे चौक ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ,एसटी स्टँड, खर्डेकर चौक मार्गे कागल पोलीस ठाण्यात पोलीस संचलनास पूर्णविराम देण्यात आला.
Advertisements

दरम्यान निपाणी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्या जवळ दंगल काबू योजना सराव करण्यात आला.
AD1