मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून ” गजानन सरगर ” हे नुकतेच रुजू झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची बदली कोकण विभागाकडे झाली असून त्यांच्या रिक्त जागी मुंबईहून बदलून आलेले पोलीस निरीक्षक गजानन सरगर रुजू झालेनंतर मुरगूडच्या श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisements

यावेळी सरगर म्हणाले कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाणार आहे. तसेच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मुरगूडमधील मुख्य रोडवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.

Advertisements

या सत्कारप्रसंगी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. किरण गवाणकर, व्हा. चेअरमन श्री. प्रकाश सणगर, संचालक सर्वश्री प्रशांत शहा, पत्रकार शशी दरेकर, हाजी धोंडीराम मकानदार, किशोर पोतदार, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, कर्मचारी विनायक हजारे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!