मुरगूडच्या बाजारात मोबाईल चोरटयाला पोलिसानीं रंगेहात पकडले

मुरगूड ( शशी दरेकर ) :मंगळवारी मुरगुडच्या आठवडी बाजारामध्ये मोबाईल चोरणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी गस्तीवर असतानाच रंगेहात पकडले. रात्री उशिरा या प्रकरणी चौकशी व नोंदीचे काम पोलीस ठाण्यात चालू होते.

Advertisements

          मुरगूडात दर आठवड्याला मंगळवारचा आठवडी बाजार होत असतो. या बाजारात मुरगुड परिसरातील २० ते २५ खेड्यांमधून शेतकरी व ग्राहक भाजीपाल्याच्या व इतर खरेदी – विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याचाच फायदा उठवत मोबाईल चोरटे अनेकांचे मोबाईल लंपास करत असतात. आठवड्याच्या दर मंगळवारी मोबाईल लंपास झाल्याच्या तीन-चार घटना नोंद असतातच. या अनुशंगाने बाजारात पोलिसांची करडी नजर होती .

Advertisements

       आज मनोज बसवराज वडर रा. उचगांव झोपडपट्टी, जकात नाक्याजवळ ता. करवीर याला मोबाइलसह पोलिसांनी ताब्यात घेतले  अन्य दोघा तिघांनाही संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

               दरम्यान, सावर्डेकर कॉलनीतील शिवाजी रामचंद्र गोरुले यांचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल अज्ञात चोरट्याने बाजार खरेदी करत असताना वरच्या खिशातून चोरून नेल्याची फिर्याद गोरुले यांनी मुरगुड पोलिसात केली. अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.

1 thought on “मुरगूडच्या बाजारात मोबाईल चोरटयाला पोलिसानीं रंगेहात पकडले”

Leave a Comment

error: Content is protected !!