शिवराज विद्यालयचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
मुरगूड ( शशी दरेकर ) – शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनातील त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून यातूनच भविष्यकाळातील खेळाडू व कलावंत उदयास येतील असे प्रतिपादन पंचायत समिती कागलच्या गटशिक्षणाधिकारी सौ सारिका कासोटे यांनी केले.
त्या येथील शिवराज विद्यालय मुरगूडच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी आयोजित क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे कार्यवाह आण्णासाहेब थोरवत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एज्युकेशन संस्थेच्या संचालिका श्रीमती आशालता भोसले, म्हाकवे इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बी डी भारमल, सामाजिक कार्यकर्ते देवानंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
गटशिक्षणाधिकारी सौ कासोटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. तर श्रीमती आशालता भोसले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. गटशिक्षणाधिकारी सौ कासोटे पुढे म्हणाल्या, शालेय जीवनातील विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उत्तम व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून भावी काळामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि कलावंत निर्माण होतील.
यावेळी क्रीडा महोत्सवात प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांचे हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेली महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककलेतील भारुड गीत, पिंगळा गीत, गोंधळी गीत, बैलगाडा गीत, नंदीबैल गीत या गाण्यांच्या सादरीकरणाने मान्यवर पाहुण्यांसह रसिक प्रेक्षक भारावून गेले.
या कार्यक्रमासाठी श्री सिध्दू पाटील (सरपंच कुरणी), उपप्राचार्य एल व्ही शर्मा, उपमुख्याध्यापक व्ही बी खंदारे, पर्यवेक्षक प्रवीण सुर्यवंशी, उद्योजक उत्तम कापसे, अॅड. खाशाबा भोसले, शिवराज सर्व्हंटस पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संदीप मुसळे, कोजिमाशि संचालक अविनाश चौगले, क्रीडाशिक्षक ई व्ही आरडे,सौ.भूमी जालीमसर, सौ सीमा भोसले,मुख्याध्यापिका सौ. भारती सुतार , सौ ,श्रीमती वाय. बी. सुर्यवंशी,श्रीम. एस बी पाटील- राऊत, सौ एस बी खामकर, श्रीमती एम डी यरनाळकर,योगिनी शेटे, जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ स्नेहा चव्हाण उपक्रमशील शिक्षिका सौ पुष्पलता रणदिवे, यांच्यासह शिक्षक , पालक, नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जी.के भोसले यांनी, सूत्रसंचालन श्री शशिकांत सुतार यांनी, तर आभार पर्यवेक्षक प्रवीण सुर्यवंशी यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर ए जालीमसर, पी डी रणदिवे,सौ एस डी देसाई, सौ व्ही पी सावर्डेकर, सौ अर्चना पाटील, सौ कोमल बुवा, डी एल कुंभार, बी वाय पाटील,के डी कुदळे, एन एच चौधरी, डी आर लोखंडे, पी डी ढोणुक्षे, आर आर चव्हाण, पी एम फासके यांनी योगदान दिले.