मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड नगरपालिकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना नागरीकांपर्यंत पोहचाव्या व योजनांची जागरूकता निर्माण व्हावी व जास्तीत जास्त नागरीकांना या योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहिम राबविण्यात येणार असून या अनुशंगाने मुरगूड शहरातील सर्व नागरीकांनी या योजनांचा लाभ देण्याच्या हेतूने रविवार दि .३१ / १२ / २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १या वेळेत मुरगूड एस .टी. बसस्थानक या ठिकाणी संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असून
या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, आयुष्यमान भारत योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आधारकार्ड अपडेशन योजना व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मुरगूड नगरपालिका प्रशासनाने केले आहे.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.