कागल : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने राज्यस्तरीय ऊस विकास परिषदेचे आयोजन कागल तालुक्यात बामणी येथे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ऊस उत्पादक संघाने सन 2022 मध्ये विक्रमी ऊस पिक घेणाऱ्या 28 शेतकऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने -पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती नाजूक झाली आहे. शेतीमध्ये अनेक समस्या वाढत आहेत. या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि ऊस शेतीशी पूरक उद्योजकांनी एकत्रित येऊन चर्चा केली आहे. समस्येचे कारण शोधून त्याच्यावर ठोस उपाय सुचवण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. यासाठीच महाराष्ट्र राज्य उत्पादन संघाने राज्यस्तरीय ऊस विकास परिषदेचे आयोजन १२ मार्च रोजी केलेले आहे .संजीव दादा माने हे एकरी शंभर टन सहज शक्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ऊस विकास अधिकारी उत्तमराव परीट- कोरे हे आदर्श शेती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. संतोष सहाणे हे सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत .सत्यजित भोसले यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.
सन 2022 चा महाराष्ट्र ऊस भूषण गौरव पुरस्कार खालील व्यक्तींना जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .ते असे सुरेश चिंचवडे (रा.चिंचवड जिल्हा पुणे), विक्रमसिंह भोसल (रा. रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा), नामदेव पवार (रा. अकोले जिल्हा सोलापूर), गजानन कदम (जिल्हा सांगली), अमोल खोत (रा.करनूर,जिल्हा कोल्हापूर), भारत बाबर (जिल्हा सोलापूर), अक्षय भोसले (जिल्हा सातारा), प्रतीक झिने(जिल्हा सातारा), जयराज भोपळे(बारामती जिल्हा पुणे), धैर्यशील पाटील (रा.साखराळे,जिल्हा सांगली ), रावसाहेब वडवळे(रा. दुधगाव तालुका मिरज, सौ विद्युलता देशमुख( रा. शेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली,) अमोल सर्जेराव लोंढे,( रा. पिंपळनेर तालुका माढा जिल्हा सोलापूर), लक्ष्मण पाटील (रा.बामणी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर), सागर खोत रा.करनूर तालुका- कागल, जिल्हा कोल्हापूर), महादेव ताकमारे (रा. कोगील तालुका करवीर), संदीप आरगे (रा. कुंभोज ,तालुका हातकणंगले), शरद भंडारी (रा. नरडे, तालुका हातकणंगले प्रशांत चांदोबा ( रा. दानोळी, तालुका -शिरोळ)
महाराष्ट्र ऊस विकास कार्य गौरव पुरस्कारकर्ते असे, कृष्णात पाटील( रा लिंगनूर दुमाला तालुका कागल), उत्तम परीट (रा. शेंडूर ता कागल), कृष्णात पाटील ( रा.सांगाव ता. कागल), बापू सो आवटे (रा. पट्टणकडोली ता हातकणंगले), डॉ.जनार्दन पाटील (रा. जाधववाडी कोल्हापूर),
ते म्हणाले महाराष्ट्र आदर्श कृषी पत्रकार कार्य गौरव पुरस्कारकर्ते असे, शिवाजी हळवणकर (रा. वठार, ता पंढरपूर), राजकुमार चौगुले (रा.दानोळी ता शिरोळ),
तारीख 12 मार्च 2023 रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत आर के मंगल कार्यालय बामणी तालुका कागल या ठिकाणी शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे पत्रकार बैठकीस अतुल माने, अतुल मस्के, किरण भाऊ चव्हाण, उत्तम परीट, राजेंद्र पाटील, कृष्णात पाटील, सचिन पाटील, अमोल खोत, कल्लाप्पा कोरे, गिरीश कुलकर्णी, प्रल्हाद मस्कर ,मुन्ना पिरजादे ( हमीदवाडा) आधी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.