कागल(विक्रांत कोरे): भरधाव वेगाने मोटरसायकल चालवून रस्त्यावरील घोड्याला ठोकरले .याअपघातात मोटरसायकल वरील इसम गंभीर जखमी होऊन मयत झाला .ही घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास, कागल-निढोरी मार्गावर, बामणी येथे घडली .तानाजी चंद्रकांत हजारे, वय वर्षे – 61 ,राहणार- मडिलगे खुर्द ,तालुका -भुदरगड, जिल्हा -कोल्हापूर, सध्या राहणार- प्राध्यापक कॉलनी जवळ, कृष्णराव सोसायटी, आपटे नगर ,कोल्हापूर. असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे.

Advertisements

       कागल पोलिसात झालेल्या नोंदीनुसार. मयत तानाजी हजारे हा आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर गाडी क्रमांक -14 ,एस- 8712 वरून कागल हून निढोरी कडे जात होता.बामणी गावचे हद्दीत आर के मंगल कार्यालय जवळ आला असता,रस्त्यावरून जाणाऱ्या घोड्याला हजारे याने जोराने ठोकरले. तो जमिनीवर पडल्याने गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हजारे यांनी भरधाव वेगाने निष्काळजीपणे मोटरसायकल चालवली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताचा तपास कागल पोलीस ठाण्याचे, हवालदार -एस एम जाधव हे करीत आहेत.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *