
गोकुळ शिरगाव (सलीम शेख ): वाढती गांजा विक्रीला आळा घालण्यासाठी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यातील अमली पदार्थ सापडण्याचे सत्र सुरूच आहे. या धर्तीवर कणेरी तालुका करवीर येथे गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. दत्तात्रय पांडुरंग माने (वय ४४, रा. व्हन्नूर ता. कागल) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२:२५ च्या सुमारास कणेरी गावच्या हद्दीत माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवर ही कारवाई करण्यात आली. माने हे हिरो होंडा सीडी मोटरसायकलवरून गांजा घेऊन जात होते. पोलिसांनी त्यांना थांबवून झडती घेतली असता त्यांच्याजवळ ५८० ग्रॅम गांजा (किंमत ११,४८०/- रुपये) सापडला. तसेच, पोलिसांनी त्यांची मोटरसायकल (किंमत २०,०००/- रुपये) जप्त केली आहे.

माने यांच्याविरुद्ध गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ विकत असल्यामुळे विविध कलमानखाली त्यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टि. जे. मगदूम, बादोले करत आहेत.
“This is exactly what I was looking for, thank you!”
“Well explained, made the topic much easier to understand!”
Hello There. I found your weblog using msn. That is an extremely smartly written article. I’ll be sure to bookmark it and return to learn more of your helpful information. Thank you for the post. I’ll definitely comeback.