उत्कृष्ट वक्तृत्वाच्या बळावर खासदार स्व. सदाशिवराव मंडलिक लोकनेता बनले – प्राचार्य डॉ. जी. पी. माळी

मुरगूड ( शशी दरेकर ) : उत्कृष्ट वक्तृत्वाच्या बळावर खासदार स्व. सदाशिवराव मंडलिक लोकनेता बनले. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी केले. ते खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उद्घाटक म्हणून बोलत होते.

Advertisements

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, उत्कृष्ठ वक्ता मोठ्ठा नेता होतो. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक होय ! उत्कृष्ठ वक्तृत्वामुळे त्यांची समाजाशी नाळ जुळली. जनता हेच त्यांनी टॉनिक मानले. समाजाभिमुख सेवेचे कंकण हाती बांधले. त्यामुळे केवळ ते आमदार, खासदार इतकेच नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या आर्धा डझन खात्याचे मंत्री झाले. लोकशाही मध्ये वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या गुणांना अनन्यसाधारण महत्व आहे. हे सारे गुण खासदार मंडलिकांच्या अंगी असल्यामुळे ते लोकनेता झाले.

Advertisements

डॉ माळी पुढे म्हणाले. भाषण ही कला आहे. कोणत्याही कलेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. स्पर्धकाना आपण जिंकणारच असा आत्मविश्वास असावा लागतो. इतरांची कॉपी करू नका. प्रत्येक शब्द जपून वापरा. श्रोत्यांशी संवाद साधतोय असं स्पर्धकानी बोलावं. श्रोते कोणत्या प्रकारचे आहेत. वेळ कोणती आहे . परीक्षक किती अंतराव आहेत. आवाजाचे भान असावे आदी बाबींचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी स्पर्धकांना केले.

Advertisements

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे होते. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, सदाशिव मंडलिक यांचे वक्तृत्व आजही सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वसा या स्पर्धेच्या माध्यमातून मांडला जावा. ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय मंडलिकसाहेब दुरदृष्टी असलेला दृष्टा नेता होते. ग्रामीण भागातील सारी जनता शिक्षीत आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी झाली पाहिजे म्हणून त्यानी ग्रामीण भागात शाळा महाविद्यालयांचे जाळे विनले.

स्वर्गीय मंडलिक साहेब त्यानंतर त्यांचे सुपूत्र माजी खासदार प्रा संजयदादा मंडलिक आणि ॲड वीरेंद्र मंडलिक अशा मंडलिकांच्या तीन पिढ्यांनी शैक्षाणिक यज्ञासाठी वाहून घेतले आहे . केवळ त्यांच्या त्यागी वृत्तीमुळेच चोवीस वर्षे विनाखंडीत वक्तृत्व स्पर्धा सुरू आहेत . असे कृतज्ञापूर्वक सांगितले . यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भैरवनाथ डवरी, परीक्षक डॉ मांतेश हिरेमठ, डॉ बळवंत मगदूम, साहित्यिक सुभाष चोपडे उपस्थित होते .

कै. दादोबा मंडलिक सभागृहामध्ये होत असलेल्या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ .जी. पी. माळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेस पुष्पाहार घालून करण्यात आले.

उपप्राचार्य डॉ शिवाजीराव पोवार यांनी स्वागत, डॉ सुखदेव एकल यांनी प्रास्ताविक, प्रा. हेरवाडे यांनी सूत्रसंचलन तर नितेश रायकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक प्रशासकीय सेवक, स्पर्धक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!