शिवजयंती निमित्त उद्या मोफत मूर्ति वाटप कार्यक्रमाचे आयोजन

मुरगूड (शशी दरेकर) :शिवजयंती घराघरात शिवजयंती मनामनात या उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही शिवभक्त मुरगुडकर यानी शिवजयंती दिवशी मोफत छ .शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे .

Advertisements

शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी आणि शिवरायांच्या विचारांचा जागर लहान थोरांमध्ये रुजावा, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे . शिवजयंतीदिनी सकाळी ८.३०  वाजल्यापासून शिवतीर्थ मुरगूड येथून या शिवमूर्ती वितरित केल्या जाणार आहेत.

Advertisements

ज्याप्रमाणे घरोघरी गणेशोत्सव साजरा होतो, त्या पद्धतीने मूर्ती घेऊन सर्व मूर्ती शिवभक्तांनी घरोघरी नेऊन त्यांचे पूजन करावे असे आवाहन शिवभक्त मुरगूडकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Advertisements

यावर्षीची लहान मुले छोटा मंडळ स्थापन करून शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात अशा मंडळांना प्राध्यान्य देण्याचा संकल्प करण्यात आल्याचे तसेच गेल्यावर्षी ७५ मूर्ती तर यावर्षी २ फुटाच्या ५० मूर्ती वाटपाचे नियोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, जगदीश गुरव ,तानाजी भराडे, संकेत भोसले, प्रकाश पारिशवाड, संकेत शहा यांनी हे संपूर्ण नियोजन केले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!