
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे बाजारपेठ शिवप्रेमीतर्फै विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ठिक९ वाजून ३० मिनिटानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मा .सौ. अरूणा संदिप कांबळे ( आयुर्वेद अँन्टी ऑक्सीडंट डिलर ) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
यावेळी मा.श्री. अरुण धर्माधिकारी ( जेष्ठ नागरीक ) व मा .सौ. रोहिणी सापळे ( उद्योजिका ) हे प्रमुख पाहुणे लाभणार आहेत .
प्रतिमापूजनानंतर इतिहास अभ्यासक मा . श्री .ओंकार हेमंत पोतदार यांचे ” जाणता राजा ” हा विषय घेऊन व्याख्यान होणार आहे . व्याख्यानानंतर सौ .विद्या सिध्देश्वर , सौ . समिक्षा तांबट , श्रीमती नंदिनी जाधव , डॉ .सौ विनिता साठे , सौ . भारती खैरे , व श्री . शिवाजी पाटील ( ड्रायव्हर ), श्री . चंद्रकांत तिकोडे ( फौजी ) , श्री . निवास कदम ( सेवानिवृत्त पोलिस ) , डॉ .श्री. बबन भारमल, श्री . विराज रणवरे आदि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत एस.टी. चालक – वाहक- मॅकेनिक यांचा यथोचित सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे .
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्य होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा शिवप्रेमी, नागरीकानीं लाभ घ्यावा असे आवाहन शिवभक्त धोंडीराम परीट व शिवप्रेमी मुरगूड यांच्या वतीने करण्यात आले आहे .