कागल नगरीमध्ये निरंकारी सत्संग सोहळा अत्यंत उत्साहात साजरा

कागल (प्रतिनिधी) : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा  महाराज यांच्या पावन कृपा आशिर्वादाने कागल मधील दुधगंगा विद्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम अंत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. युवा कीर्तनकार तेजस घोरपडे यांनी मुख्य प्रवचनाचा सारं सांगितला.

Advertisements

ते म्हणाले, चौऱ्यांशी लक्ष प्रकारचे जिवाचे फेरे आहेत . त्यातून मिळालेल्या मनुष्य जन्माचे कल्याण केवळ समयाच्या सदगुरू कडून प्राप्त होणाऱ्या ब्रह्मज्ञानाने शक्य आहें. आज च्या समयाला हे ब्रह्मज्ञान सद्गुरू माता सुदीक्षा  महाराज देत आहेत .आणि मानवमात्राचे कल्याण करत आहेत. संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृती करून सर्व मानवमात्राला एक करण्याचा प्रयत्न करत आहे. असे प्रतिपादीत केले.

Advertisements

सत्संग साठी हजारो च्या संख्येने परिसरातील भाविक तर उपस्थित होतेच शिवाय मुंबई पुण्याहुन भक्त गोतावळा जमला होता. उत्कृष्ट स्टेज संचलन पुण्याचे नोटरी वकील  संतोष मोरे ह्यांनी केले .कलाकार भक्तांनी उत्कृष्ट भक्तिरचनेचे  सादरीकरण केले.

Advertisements

कार्यकर्मानंतर सद्गुरू माताजींच्या आशिर्वादाने जिज्ञासू भाविकांना ब्रह्मज्ञान देण्याची सेवा, दत्तात्रय गोरे यांनी केली. झोनल इंचार्ज महात्मा अमरलाल  ह्यांचे विशेष सहकार्य लाभले. क्षेत्रीय संचालक शहाजी पाटील ह्यांनी सेवादल च्या माध्यमातून कार्यक्रमाच्या सेवेचे अतिशय सुंदर नियोजन केले होते .सर्वांच्या वतीने  सत्कार  शिवाजी डोंगळे  ह्यांनी केला

कार्यक्रमाचे नियोजन कागल साधसंगत कडून करण्यात आले होते कागल मधील नारी सत्संग आणि बाल सत्संग ने कौतुक करावे असे कार्य केले.

दुधगंगा धरणग्रस्त वसाहत आणि ग्राउंड कमीटीने अतुल जोशी यांचे मार्गदर्शनाखाली सहकार्य केले आणि असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत अश्या भावना मनोगतातून सर्वांनी व्यक्त केल्या. शिवाय निरंकारी साप्ताहिक सत्संग प्रत्येक रविवारी साय ७-९ ह्या वेळेमध्ये राममंदिर ला लागून असणाऱ्या शाहू नगर वाचनालयाच्या हॉल मध्ये होत असते भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जितेंद्र पटेल यांनी केले. उपस्थित भक्तगणांचे स्वागत एडवोकेट संतोष मोरे यांनी केले.

या कार्यक्रमास क-याप्पा हराळे, गणपत गाडी वड्डर, संजय शेणवी, कौतुक बनके ,सुनील बेकनाळे ,सिदनेर्ली -हुपरी सेवादल युनिटचे सेवादार. कागल परिसरातील सत्संग आणि सत्संग चे प्रबंधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!