कागल – आमदार मुश्रीफ यांचे प्रयत्नाने मंजुर कागल येथे मौलाणी परीसरात चव्हाण मुजावर DP रोहित्र सध्या अस्थित्वात आहे . यावर जादा मोटर्स असल्याने सातत्याने लोड वाढलाकी लाईट जाणे, विज दाब वाढला की मोटारी जळणे यामुळे या परीसरातील शेतकऱ्यांचे व इतर पिकांचे व आर्थिक मोठे नुसान होत होते . त्यामुळे या परीसरातील शेतकऱ्यांची सातत्यान नवीन DP ( रोहित्र) वाढवण्याची मागणी होत होती. या बद्दल आमदार मुश्रीफसो यांनी लक्ष घालून कोल्हापूर जिल्हा नियोजण मंडळा कडून ( D.P.D.C. ) मधून यासाठी रू . १०.०३ लाख निधी उपलब्ध करून दिला.
त्यामुळे या परीसरात नवीन DP मंजुर होऊनं तो बसवण्यास रु. १० लाख मंजुर झाल्याने मार्ग मोकळा झाला आहे . त्यामुळे या परीसरातील शेकडो शेतकऱ्यांची अडचण दुर झालेली आहे. या कामी जिल्हाधिकारी मा. रेखावार साहेब व म.रा.वि.म. अधिकारी यांचे सहकार्य लाभले तसेच श्री प्रवीण काळबर, श्री अस्लम मुजावर (माजी नगरसेवक) आणि त्या परीसरातील शेतकऱ्यांचे प्रयत्न लाभले. तसेच कागल येथील गोसावी समाज परीसरात स्वच्छता गृह अपूरी असल्याची तकार त्या परीसरातील नागरीकांची होती. त्यांच्या मागणीस ही आमदार मुश्रीफ साहेब यांनी सहकार्य करून गोसावी समाज परीसरात आमदार फंडातून रु १० लाख मंजूर करून नवीन ७ स्वच्छता गृहे बांधण्यास मंजूरी दिल्याबद्दल आभार . या कामी नगरसेवक संजय चितारी , सतिश घाटगे, आरकाश मकवानी, सुरेश गोसावी, विजय गोसावी, विजय मकवाने, तानाजी मकवाने, गुलाब मकवाने, पांडू मकवाने, युवराज ज्युवे, ऊमाजी मकवाने व इतर गोसावी समाजातील प्रमुखांचे सहकार्य लाभले.