मडिलगे (जोतीराम पोवार) : समोरच्या व्यक्तीला कधीही कमी न लेखता जीवनात तत्त्वाशी कधीही तडजोड करू नका असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक पी.जी.केणे यांनी केले ते 28 वर्षानंतर एकत्र जमलेल्या वाघापूर हायस्कूलच्या 1995 ..96 सालच्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मार्गदर्शक शिक्षकांचा मानपत्र सत्कार सोहळा व स्नेह मेळावा आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ गुरुवर्य म्हणून बोलत होते.
प्रारंभी पी जी केणे, ए.एम.बरकाळे, डी.पी.पाटील, व्ही.व्ही.कुराडे, जे.आय.शिंदे यांच्या हस्ते दिवंगत विद्यार्थी जोतीराम कोळी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
यावेळी बोलताना पी.जी .केणे यांनी 90 च्या दशकातील शिक्षण प्रणाली व आजच्या डिजिटल क्रांतीतील बदललेली शिक्षण प्रणाली तसेच दिवसागणिक अभ्यासक्रमात होत असलेले बदल याविषयी विवेचन केले.
यावेळी वाघापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक डी पी पाटील म्हणाले ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला संस्कारशीलता घडवली तसे तुम्हीही भविष्यात यापुढे आपली मुले हीच आपली खरी संपत्ती असून मुलांचा विकास हाच आपल्या कुटुंबाचा विकास असून नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देण्याची कुवत ठेवा माजी मुख्याध्यापक ए एम बर काळे म्हणाले एकत्र मित्रां मुळे प्रेम जिव्हाळा, आपुलकी तसेच एकमेकांशी संवादाने मैत्रीतील नाते अधिक घट्ट होते म्हणूनच मित्र हीच आपली खरी संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
जे. आय. शिंदे यांनी मार्गदर्शन करताना कुठल्याही क्षेत्रात हाती घेतलेले कार्य कर्तव्य हे सूत्रबद्ध पद्धतीने पार पाडून जीवनात वेळेला महत्त्व द्या असा मौलिक सल्ला दिला व्ही व्ही कुराडे यांनी 28 वर्षानंतर श्रम हाच देव मानून एकत्र जमल्याबद्दल सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे विशेष असे कौतुक करून भविष्यात यापुढेही विवेक नम्रता सुचक व सदाचारी वागणूक पाळून आपल्या पाल्यालाही मोठं होण्याची स्वप्न सत्यात उतरवा असेही सांगितले यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनीच्या हस्ते उपस्थित गुरुवरांचा शाल, श्रीफळ ,मानाचा कोल्हापुरी फेटा, व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मधून मनोगत व्यक्त करताना सौ. संगीता काशीद जाधव हिने गुरुप्रती जीवनातील आदर महत्त्व विशद करताना जे मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यामुळेच आज मला एक आद्य शिक्षिका होण्याचे भाग्य लाभले असे सांगून ऋन व्यक्त केले.
यावेळी कृष्णात जठार, सागर जठार, युवराज आरडे, धनाजी आरडे, सौ. वंदना जठार खराडे, सौ. शोभा परीट यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांविषयी भावना व्यक्त करताना 28 वर्षांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला दरम्यान तब्बल 28 वर्षानंतर मोठ्या संख्येने वर्गमित्र मैत्रिणी दिलखुलास एकत्र जमल्याने आनंदाला उधाण आले. स्वागत संदीप जठार यांनी प्रास्ताविक सौ संगीता काशीद जाधव यांनी तर आभार पत्रकार धनाजी आरडे यांनी मानले.
I simply could not go away your web site prior to suggesting that I really enjoyed the standard info a person supply on your guests Is going to be back incessantly to investigate crosscheck new posts