आजपासून चार दिवस नामवंत मल्लांचा शड्डू आखाड्यात  घुमणार

उष्णतेमुळे कुस्त्या रात्रीच होणार आहेत; क्रीडाप्रेमी साठी गॅलरीची सोय

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या
नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आखाडा सज्ज झाला असून आजपासून चार दिवस नामवंत मल्लांचा शड्डू मैदानात घुमणार आहे.

Advertisements

           कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने व मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे बुधवार दि. ३० एप्रिल ते ३ मे या दरम्यान आयोजन केले आहे. कन्या शाळेच्या मैदानावर होत असलेल्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मॅटचे पूजन गोकूळ संचालक रणजितसिंह पाटील ( मुदाळ ) , दीपप्रज्वलन गोकूळ संचालक प्रा. किसन चौगले , ध्वजारोहण राधानगरी कागलचे  प्रांताधिकारी प्रसाद चौगले , प्रतिमापूजन कागल तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते होत आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकूळ संचालक अंबरिशसिंह घाटगे असणार आहेत .

Advertisements

             दि – १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माजी जिप उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दि – २ मे रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार गोकूळ संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते होत आहे . यामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेती  नंदिनी साळोखे ( मुरगूड ), सृष्टी भोसले ( पिराचीवाडी ) ,खोखो भारतीय खेळाडू वैष्णवी पोवार (करंजीवणे ) , फिजिक्स विषयात पीएचडी प्राप्त ऋतुजा पाटील ( कुरूकली )BISF मध्ये निवड झालेले संकेत चौगले ( मुरगूड ) यांचा सत्कार करण्यात येणार आहे .

Advertisements

तसेच दि – ३ मे रोजी सायंकाळी सहा वाजता नामदार चषक कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार संजयदादा मंडलिक राहणार आहेत. यावेळी युपीएसी परीक्षेतून आयपीएसपदी निवड झाल्या बद्धल बिरदेव डोणे याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

           या कार्यक्रमास माजी आमदार संजयबाबा घाटगे , माजी आमदार के पी पाटील , माजी आम राजेश पाटील ,गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे , बिद्री साखर संचालक प्रवीणसिंह पाटील, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, केडीसीसी संचालक भैया माने , गोकुळ संचालक युवराज पाटील , गोकूळ संचालक विश्वास पाटील , गोकूळ संचालक नवीद मुश्रीफ , कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर , केडीसीसी संचालक सुधीर देसाई , केडीसीसी  संचालक संतोष पाटील, बिद्री व्हाईस चेअरमन मनोज फराकटे , राष्ट्रवादी कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

AD1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!