मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता कागल येथिल सुवर्णमहोत्सवी व दुरवर नावलौकीक मिळवलेली श्री. लक्ष्मी -नारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२४/२५ या अर्थिक वर्षात २ कोटी ७२ लाख १ हजाराचा विक्रमी निव्वळ नफा झाला.
१५ टक्के लाभांशाची घोषणा
या नफ्यातून सर्व सभासदानां १५ टक्के लाभांश देण्यात येणार असुन त्या व्दारे २९ लाख ९ हजाराचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमन श्री. किशोर पोतदार यानीं केली. ते ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

यावेळी पोतदार म्हणाले संस्थेने अहवाल सालात ५९५ कोटी ९२ लाखांचा विक्रमी व्यवसाय केला असुन त्यात१२२ कोटी ४३ लाखांच्या ठेवीच्या आधारे ९० कोटी २ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. त्यापैकी ५३ कोटी ४० लाखांचे कर्ज हे सोने तारणावरील आहे.
ते पुढे म्हणाले ३१ लाख रुपयाचा संस्था महोत्सव निधीअंतर्गत सभासदानां दिपावली भेटवस्तू देण्याचा संकल्प असून ३१ मार्च २०२६ अखेर १५० कोटी ठेवी, १०५ कोटी कर्जे, आणि ३कोटी संस्थेला नफा करणेचे उदिष्ठ ठेवल्याचे सांगितले.
यावेळी संस्थापक संचालक जवाहर शहा यानी संस्था स्थापनेपासूनची संस्थेच्या प्रगतिची माहिती दिली. संस्थेचे ऑडिटर एस .जे. देशपांडे यानीं २०२४ / २५सालासाठी ऑडीट वर्ग ” अ ” दिलेचे जाहिर केले.

संस्थेचे सभासद व शेळेवाडी गावचे सरपंच प्रविण पाटील यानी संस्थेच्या शेळेवाडी व मुख्य शाखेसह इतर शाखांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. आय.डी. कुंभार यानीं संस्थेबद्धल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी लक्ष्मीनारायण प्रतिमेचे पूजन सभासद आनंदा पोवार, डॉ . दगडू नारे, साताप्पा पाटील, एकनाथ बरकाळे तर दिपप्रज्वलन नामदेव शिंदे, शंकर बरगे, मंगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

१०वी १२वी मध्ये गुणवताधारक पाल्यांचे चेअरमन , व्हा चेअरमन, संचालकांच्या हस्ते रोख रक्कम प्रशस्तीपत्र , गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पिग्मी एजेट सौ . वैशाली पाटील यांची कन्या शर्वरी हिची महाराष्ट्र राज्य विद्युत कंपणीकडे विद्युत सहायकपदी निवड झालेबद्दल गौरव चिन्ह देऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
संस्थेचे जनरल मॅनेजर नवनाथ डवरी यानीं अहवाल वाचन केले. सर्व विषयानां सभासदानी एकमताने मंजूरी दिली. सभेत सुदर्शन हुंडेकर, नामदेव शिंदे, दिपक घोरपडे, विनायक हावळ, प्रशांत शहा यानी चर्चेत सहभाग घेतला. सभासदांचे आभार संचालक चंद्रकांत माळवदे यानीं मानले.
सभेस व्हा. चेअरमन दत्तात्रय कांबळे, संचालक पुंडलिक डाफळे, दत्तात्रय तांबट, अनंत फर्नांडिस, रविंद्र खराडे, विनय पोतदार, चंद्रकांत माळवदे, रविंद्र सणगर, तज्ञ संचालक जगदिश देशपांडे, संचालिका सौ. सुनिता शिंदे, सौ. सुजाता सुतार, श्रीमती भारती कामत, अंतर्गत तपासणीस श्रीकांत खोपडे, मुख्य शाखेच्या शाखाधिकारी सौ. सुनिता सूर्यवंशी यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग, सभासद उपस्थित होते.