३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
मुरगुड ( शशी दरेकर ) : श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मुरगूड ता.कागल या संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सोमनाथ यरनाळकर होते. प्रथम श्रीगणेश प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनानंतर श्रध्दांजली वाचन झाले. संस्थापक चेअरमन उदयकुमार शहा यांनी स्वागत केले.
सभापती सोमनाथ यरनाळकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतची संस्थेची आर्थिक स्थिती विशद करतानां ते म्हणाले, संस्थेकडे ११६ कोटी ४ लाख ठेवी असून ९१ कोटी ७० लाखाची कर्ज दिली आहेत पैकी सोनेतारण कर्ज ३४ कोटी २४ लाख दिले आहे. गुंतवणूक ४२ कोटी ४७ लाख असून खेळते भांडवल १३६ कोटी ५७ लाख व एकूण व्यवहार ६१९ कोटी ९७ लाख आहे. अहवाल सालात संस्थेस निव्वळ नफा २ कोटी २६ लाख असून सभासदानां डिव्हीडंड १५% दिला आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारणी सदस्य बटू जाधव, संस्थेच्या कर्ज वसुली कामी उत्कृष्ठ काम केलेबद्दल शंकर पाटील, कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्ड संचालक पदी निवड झालेबद्दल दिपक माने व प्रविण सुर्यवंशी, कागल तालुका पत संस्था फेडरेशनचे संचालक राहुल शिंदे व सुनिल कांबळे, खेलो इंडीया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील कास्य पदक विजेता कु. प्रणव मोरे यांचा तसेच इ.१० वी व १२ वी तील परिक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उतीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा बक्षीस देऊन सत्कार करणेत आला.
अहवाल वाचन संस्थेचे कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांनी केले. सभासदांनी सभेपुढील १ ते १२ विषयांना कोणत्याही प्रकारची हरकत न घेता मंजुरी दिली. सभेमध्ये सभासद जयसिंग भोसले, आप्पासो कांबळे, पांडुरंग दरेकर, सौ. स्मिता भिलवडीकर, मधुकर मंडलिक यांनी चर्चेत सहभाग घेतला. सूत्रसंचालन सात्ताप्पा चौगले यांनी केले.आभार संचालक उदयकुमार शहा यांनी मानले.
यावेळी संचालक राजाराम कुडवे, आनंद देवळे, सुखदेव येरुडकर, आनंदा जालिमसर, सौ. रुपाली शहा, एकनाथ पोतदार, मारुती पाटील, प्रकाश हावळ, दत्तात्रय कांबळे, सौ. रेखा भोसले यांच्यासह सभासद, ठेवीदार, हितचिंतक, सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.