मुरगूड ( शशी दरेकर ) : आज शाहू जयंती निमित्त मुरगुड शहरात त्यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम झाले. ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात असलेल्या जुन्या इमारती समोर असलेल्या शाहू पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या इमारतीत शाहू छत्रपतींचे तीन वेळा वास्तव्य होते.
युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲड. विरेंद्र मंडलिक यांनी शाहू छत्रपतींच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. शिवरायांचे स्मारक असलेल्या या इमारतीची रंगरंगोटी स्वखर्चाने करून देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अमोल पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले की शिवरायांनी शेतकऱ्यांच्यासाठी सिंचन व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण या मूलभूत गरजांचा प्रामुख्याने विचार केला होता. यावेळी ॲड .वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

गावभागात १०० वर्षापूर्वी शाहू महाराजांनी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी एक चावी दिली होती. त्या ठिकाणच्या त्यांच्या प्रतिमेलाही हार अर्पण करण्यात आला. शाळा व सार्वजनिक संस्था मधून सुद्धा शाहू जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, माजी नगरसेवक शिवाजीराव चौगुले, डॉ. शिवाजी भुमरे ,डॉ. रवींद्र कांबळे, डॉ.तानाजी कुंभार ,मोहन कांबळे, दीपक शिंदे, सर्जेराव अवघडे, दत्ता मंडलिक, अक्षय शिंदे, संभाजी आंगज, अनिल राऊत, सर्जेराव भाट, सर्जेराव पाटील, सचिन भारमल, राजीव कांबळे, विक्रम गोधडे ,युवराज लाटकर, पांडुरंग गायकवाड, शशिकांत पाटील, तानाजी दळवी, गणपती पुजारी ,विनायक साठे, सुरेखा कांबळे, रूपाली पाटील ,बाजीराव पाटील, राजेंद्र कुंभार, यशवंत कांबळे ,नागेश गिरी, संजय जिरगे, बाबासाहेब कांबळे ,अनिल कांबळे, भिकाजी कांबळे, सूर्यकांत डवरी, यांच्यासह बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तुकाराम चौकात बबन बारदेसकर ,दलित मित्र डी. डी. चौगुले, बी एस खामकर ,सिकंदर, सुनील डेळेकर व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.