मुरगूड (शशी दरेकर) : ग्राहकांचे हक्क आणि अधिकार सर्वापर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी सर्वत्र ग्राहकदिन साजरा केला जातो.आज येथे लोकमंगल मल्टीस्टेट को – आँफ सोसायटी,लि.सोलापूर या संस्थेच्या मुरगूड शाखेतर्फे ग्राहकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय खराडे, एम.टी.सामंत,जयवंत हावळ,बी.एस.खामकर आदी प्रमुख उपस्थित होते.
समाजोपयोगी कामातून लोकमंगल ने समाजात चांगला ठसा उमठवला आहे.असे मत श्री.गंगापूरे यांनी यावेळी व्यक्त केले.प्रसंगी लोकमंगल तर्फे जेष्ठ नागरिक संघास सल्लागार सदस्य संतोष भोसले व प्रकाश तिराळे यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली.
स्वागत प्रास्ताविक जयवंत हावळ यांनी केले.सुत्रसंचालन आकाश कांबळे याने केले.आभार एम.टी.सामंत यांनी मानले.
यावेळी बाळासाहेब सूर्यवंशी,संतोष भोसले,प्रा.महादेव सुतार,सरपंच अनिल कांबळे,सिकंदर जमादार,विनायक हावळ,विश्वनाथ शिंदे,हेमंत पोतदार, सखाराम सावर्डेकर,मारुती रावण,दादोबा मडिलगेकर,सदाशिव एकल,रामचंद्र रणवरे,रामचंद्र सातवेकर,मधुकर येरुडकर,महादेव वागवेकर यांच्यासह मँनेंजर आनंदा पोवार,सुनिल खराडे आदी उपस्थित होते.