मुरगूड (शशी दरेकर) : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत मुरगूड नगर परिषदेने प्लास्टिकविरोधी मोहीम राबवून ११,९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
Advertisements
या मोहिमेत शहरातील दुकाने, हॉटेल्स, हातगाड्या आणि खाद्यगाड्यांची अचानक तपासणी करून बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या मोहिमेमुळे शहरात प्लास्टिकचा वापर कमी होईल, अशी अपेक्षा आहे. नगर परिषदेने प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीही केली आहे.
Advertisements

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी १ मे रोजी या अभियानाची घोषणा केली होती. या अभियानांतर्गत १५ ऑगस्टपर्यंत नगरपालिकांना आठ विषयांवर उद्दिष्ट्ये पूर्ण करायची आहेत.
AD1