मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथिल सर्वाच्या परिचयाची व-विश्वसनीय पतसंस्था म्हणून ख्याती असणारी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला ११ लाख४८हजारावर नफा झाला अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर यानीं दिली.
संस्थेची २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच श्री. लक्ष्मीनारायण सह पतस्थेच्या हॉलमध्ये पार पडली . यावेळी अध्यक्षस्थानावरून गवाणकर बोलत होते. गवाणकर म्हणाले अहवाल सालात संस्थेची उलाढाल ९४ कोटी५२ लाख झाली असून संस्थेकडे १६ कोटी११ लाख ठेवी आहेत . योग्य तारणावर११ कोटी९१ लाख कर्ज वाटप केले असून त्यापैकी ६ कोटी५० लाख सोनेतारण कर्ज आहे . संस्थेला ऑडिट वर्ग “अ ” आहे . संस्थेच्या सभासदांच्या विश्वासास पात्र राहून संस्थेचा कारभार व कार्यतप्तर संचालकांच्यामुळे संस्थेची योग्य वाटचाल सुरू आहे . असे त्यानीं सांगितले.
संचालक श्री . प्रशांत शहा यानीं आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दच्या कार्याचा धावता आढावा घेतला . संचालक श्री . किशोर पोतदार यानी संस्थेचा धावता आढावा घेत दिवाळी निमित्य सभासदानां भेटवस्तू देणार असल्याचे जाहीर केले. विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन सचिव श्री . सुदर्शन हुंडेकर यानीं केले .सभेत विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे चेअरमन गवाणकर , सचिव हुंडेकर यानीं दिली . यावेळी झालेल्या चर्चेत श्री . दत्तात्रय परीट , श्री . श्रीकांत खोपडे , श्री . नवनाथ डवरी, श्री . किरण कुरडे , श्री . रमेश सावंत, श्री . सुनिल कांबळे ( कुरुकलीकर ), रघुनाथ सुर्यवंशी , आकाश रेंदाळे यानीं सहभाग घेतला . १०वी१२वी परिक्षेत गुणानुक्रमे पाहिल्या तीन क्रमांकाच्या पाल्यानां चेअरमन,व्हा . चेअरमन , व संचालकांच्या हस्ते रोख बक्षिस, सन्मानपत्र , गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .
तसेच सा. गहिनिनाथचा सन्मान पुरस्कार प्राप्त मा . श्री . शशी दरेकर ( पत्रकार ) यांचा सभापती यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. श्री .रमेश सावंत , किरण कुरडे , धोंडिराम परीट यानीं यावेळी संस्थेच्या यशस्वी वाटचाली बद्दल मनोगत व्यक्त केली.
यावेळी चेअरमन श्री . किरण गवाणकर , व्हा . चेअरमन सौ . रोहिणी तांबट . संचालक सवश्री प्रशांत शहा, हाजी धोंडीराम मकानदार , नामदेवराव पाटील , साताप्पा पाटील , शशिकांत दरेकर , प्रदिप वेसणेकर , किशोर पोतदार , प्रकाश सणगर , महादेव तांबट, संदिप कांबळे , यशवंत परिट , सुरेश जाधव ,संचालिका सौ . संगीता नेसरीकर , कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यांच्यासह कर्मचारी वर्ग , सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या २३ व्या सर्वसाधारण सभेचे सुत्रसंचलन श्री .विनय कुलकर्णी
(सर ) यानीं केले. शेवटी आभार संचालक श्री. संदीप कांबळे यानीं मानले.