कोल्हापूर : गुरुवारी शपथविधी सोहळा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग होणार असल्याचं सांगितलं. विधानसभा निकालानंतर महायुतीने वेगळी भूमिका घेतलीय. यावरून शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झालीय. दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग झाला तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन असं तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी सुतोवाच केलं होतं.
मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग होणार असं सांगितल्यावर मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आमदारांची अडचण झालीय. कोल्हापुरातील महायुतीच्या सर्व आमदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत संबंधित आमदारांनी ’एकतर बाप दाखवावा, नाहीतर श्राद्ध घालावे’ असं शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी म्हटलंय.
सत्तेसाठी काही करणाऱ्या लोकांवर कधी विश्वास ठेवणे खूप वाईट आहे.