मुरगूड मधून ५८ वर्षीय शेतकरी बेपत्ता

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड, ता. कागल: येथील श्रीराम मंगल कार्यालयातून २ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बाळासो शिवाप्पा लोंढे (वय ५८, रा. सोनगे, ता. कागल, जि. कोल्हापूर) हे बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांचा मुलगा अमोल बाळासो लोंढे (वय ३४, धंदा-फेब्रिकेशन, रा. सोनगे यांनी मुरगूड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, बाळासो लोंढे हे श्रीराम मंगल कार्यालयात एका लग्नसमारंभासाठी आले होते. ते कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. त्यानंतर त्यांचा आजूबाजूला, पै-पाहुणे आणि नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला, परंतु ते मिळून आले नाहीत. त्यामुळे ते बेपत्ता झाल्याची खात्री पटल्यानंतर मुलगा अमोल यांनी पोलिसांत वर्दी दिली.

Advertisements

बेपत्ता झालेल्या बाळासो शिवाप्पा लोंढे यांचे वर्णन: रंग: सावळा, नाक: सरळ, केस: काळे-पांढरे, अंग: सडपातळ, उंची: अंदाजे ५ फूट, पोशाख: पांढऱ्या रंगाचा पट्ट्यापट्ट्याचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट, डोक्यावर टोपी, गळ्यात केशरी रंगाचा टॉवेल, पायात चप्पल,

Advertisements

या घटनेची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल घस्ती यांनी घेतली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंभार करत आहेत. नागरिकांना बाळासो लोंढे यांच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास तात्काळ मुरगूड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!