कोल्हापूर दि. 28 (जिमाका) : इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 1 मार्च, 2024 रोजी मुख्यमंत्री महोदयांचे समिती कक्ष, विधान भवन, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे अवर सचिव निलेश पोतदार यांनी कळविले आहे.
या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह संबंधित शिष्टमंडळ, जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, राजकीय प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Wonderful web site Lots of useful info here Im sending it to a few friends ans additionally sharing in delicious And obviously thanks to your effort