राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णयाची शक्यता

कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात कागल नगरपरिषदेतील २००३ पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. कागल नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

Advertisements

या बैठकीला संबंधित नगरपालिका प्रशासनासह जिल्हा नगर प्रशासन अधिकारी आणि संबंधित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमांबाबत चर्चा झाली असता, नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, शासनाकडून संबंधित निधी मिळाल्याशिवाय या रकमा देता येणार नाहीत. तसेच, नगरपालिकेच्या फंडात तेवढा निधी नसल्यामुळे एकरकमी सर्व रक्कम निवृत्त कर्मचाऱ्यांना देणे शक्य नाही.

Advertisements

यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरपालिका फंडातील मर्यादांचा विचार करता, यावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरावर पुढील आठवड्यात बैठक आयोजित करावी लागेल, अशी माहिती दिली. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकांवर तोडगा काढण्यासाठी आता राज्यस्तरावर प्रयत्न केले जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!